गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच
मुंबई : काल महायुतीचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता ११ डिसेम्बरला अन्य मंत्र्यांची शपथविधी आणि खातेवाटप होणार आहे. मात्र आतापासूनच गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. खरतर गृहमंत्री पदासाठी याआधी बराच खल झाला आहे. आताही सुरूच आहे.
ग्रह खात्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी आग्रही आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी गृह खातहि आम्हला मिळालं पाहिजे असा आग्रह धरला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबरावांनी जरा समजूतदारपणे बोलावे. असं बोलून ग्रह खात मिळत नाही.