पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात उपसाबंदी
राधानगरी प्रतिनिधी : निवास हुजरे
को
ल्हापूर, दि. 13 (जिमाका) :पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात उन्हाळी हंगाम 2022-23 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.
भोगावती नदी- (राधानगरी धरण ते शिंगणापूर उर्ध्वबाजू) कार्यवाहीचा भाग-
राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग. तुळशी धरणापासून ते बीड को.प.बंधाऱ्यापर्यंतचा भाग, कुंभी धरणापासून भोगावती नदी संगमापर्यंतचा भाग, कासारी धरणापासून प्रयाग चिखली संगमापर्यंतचा भाग, नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रावर उदि. 18 ते 20 एप्रिल 2023 असे तीन दिवस उपसाबंदी करण्यात येत आहे.
पंचगंगा नदी- (शिंगणापूर अधोबाजू ते शिरोळ बंधारा) कार्यवाहीचा भाग-
शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापासून ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरावरील भगामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रासाठी दि. 21 ते 23 एप्रिल 2023 असे तीन दिवस उपसाबंदी करण्यात येत आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही श्री. बांदिवडेकर यांनी कळविले आहे.