HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पोलिस कर्मचार्‍यांना भागीरथी महिला संस्थेच्या भगीनींनी बांधला स्नेहबंधनाचा धागा

पोलिस कर्मचार्‍यांना भागीरथी महिला संस्थेच्या भगीनींनी बांधला स्नेहबंधनाचा धागा

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास राबणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांबद्दल आदर, स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, भागीरथी महिला संस्थेच्यावतीने गेली १५ वर्षे पोलिस रक्षाबंधन उपक्रम राबवला जातो. शनिवारी कोल्हापूर शहरातील ५ पोलिस ठाण्यात भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी, पोलिस कर्मचार्‍यांना स्नेहधागा बांधला.

    भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून अरूंधती महाडिक यांनी ३६ हजार पेक्षा अधिक महिलांचे संघटन केले आहे. स्वयंरोजगार, स्वसंरक्षण, आरोग्य रक्षण, स्वावलंबन आणि महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह विविध उपक्रम भागीरथी संस्था राबवत आहे. गेल्या १५ वर्षापासून भागीरथी संस्थेकडून, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी, रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपूरी, शाहुपूरी, राजारामपूरी आणि करवीर पोलिस ठाण्यात, पोलिस रक्षाबंधनाचा उपक्रम पार पडला. 

   जूना राजवाडा पोलिस ठाण्याचेे निरीक्षक संजीव झाडे यांची भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी भेट घेतली. पत्रकार अश्‍विनी टेंबे, स्मिता कोठावळे, ऐश्‍वर्या देसाई, सरीता हारुगले, संगीता पावले, संध्या मेढे, रोहिणी मेथे, स्नेहा केनभावी, प्रिया चिवटे यांनी पोलिस कर्मचार्‍यांचे औक्षण करून आणि कृतज्ञता व्यक्त करत, त्यांना राखी बांधली. 

   लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यातही हा उपक्रम झाला. देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे, रूपाली कुंभार, अश्‍विनी पंडत, अर्चना मेढे, शारदा पोटे, पूजा सन्नकी, ज्योती धावारे यांनी, पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राखीचा धागा बांधला. तर शाहुपूरी पोलिस ठाण्यात शरयू भोसले, संगीता खाडे यांच्यासह महिला सदस्यांनी, पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राखी बांधली. चंद्रकला सिध्दनेर्ली, भाग्यश्री शितोळे, सिमा पालकर, शोभा चव्हाण, रंजना रणवरे, माणिक पाटील, साहिली तगारे यांनी राजारामपुरी पोलिसांना राखी बांधून स्नेह जपला. 

      करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक निवास पवार यांनी भागीरथी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पाच वर्षाच्या चिमुकलीने पोलिस निरीक्षक शिंदे यांना राखी बांधली. तसेच सुनिता घोडके, शमा घोडके, सुनिता कोळी, रंजना येडगे, सोहेज हकीम यांनीही पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राखी बांधली.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.