भाजपचे हे नेते राजीनाम्याच्या तयारीत

भाजपचे हे नेते राजीनाम्याच्या तयारीत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात निराशाजनक निकाल लागल्यानंतर राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रात भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. राज्यात काँग्रेसनंतर भाजपा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. सरकारमधून बाहेर पडून विधानसभेची तयारी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.