महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, असा विश्‍वास देणारा राज्याचा अर्थसंकल्प- खासदार धनंजय महाडिक

महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, असा विश्‍वास देणारा राज्याचा अर्थसंकल्प- खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारीत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, हा विश्‍वास उभ्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून मिळाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन, आरोग्य, सामाजिक विकास आणि पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रासाठी भरीवर तरतुद केलेला हा अर्थसंकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला पुरक असा आहे. मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेतून महाराष्ट्राचं नवं औद्योगिक धोरण बनवलं जात आहे. तर कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी सिंचन, वीज, सौर उर्जा, मुल्यवर्धीत योजना जाहीर केल्या आहेत. रस्ते, जलमार्ग, बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो अशा दळणवळण सुविधांसाठी या अर्थसंकल्पात भक्कम तरतुद करण्यात आली आहे. तर राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार असून, घरकुल अनुदानात ५० हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. महिलांसाठी कृत्रीम बुध्दीमतेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. एकूणच महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला गतीमान प्रगती देणारा आहे.

खासदार धनंजय महाडिक