राजेंद्र सूर्यवंशी यांची कोषाध्यक्ष पदी सन्माननीय निवड
शाहूवाडी:संजय पाटील
विलासराव शा.तळप- पाटील माध्यमिक विद्यालय, गोगवेचे सहा.शिक्षक राजेंद्र सूर्यवंशी यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,प्रमुख मान्यवर व अध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केली व राजेंद्र सूर्यवंशी यांच्या कार्यास शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार भगवानराव साळुंखे लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विलासराव शामराव तळप पाटील हे लाभले होते.
तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर,शिक्षक नेते व को जी मा पतसंस्था कोल्हापूर तज्ज्ञ संचालक दादा लाड, एस.डी.लाड,मुख्याध्याकपक संघ सचिव,दत्ता पाटील, कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष बाबा पाटील,शिक्षक नेते के के पाटील,उदय पाटील,शिक्षक परिषद अध्यक्ष पंडित पाटील,कार्यवाह कृष्णात पोतदार ,प्रकाश पोवार,प्रकाश पाटील,महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ गोगवे सचिव विष्णू पाटील, एन.बी पाटील ,जी एन पाटील,संजय तळप ,साहेबराव शेख,शिवाजी येसणे,राजाराम शिंदे ,मनोहर पाटील, जे के पाटील व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बी. एम.कुंभार यांनी मानले.