विधानसभेत महाविकास आघाडीला जागा दाखवू-आ.योगेश टीळेकर

विधानसभेत महाविकास आघाडीला जागा दाखवू-आ.योगेश टीळेकर

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांनी केले. कोल्हापूर महानगर आणि पश्चिम जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात ते बोलत होते. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

        या अधिवेशनास माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी आमदार अमल महाडिक, राजे समरजितसिंह घाटगे, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमू आण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.

 जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रास्ताविका मध्ये अधिवेशनाची भूमिका स्पष्ट करत सध्या शासनाच्या माध्यमातून मतदार यादी कार्यक्रम सुरु असल्याचे सांगत भाजपा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. 

      यावेळी बोलताना आमदार टिळेकर म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्यासाठी अनेक योजना आणलेले आहेत. लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजना देणारे हे सरकार शेतकरी, महिला, युवक व गोरगरिबांच्या भल्याचाच विचार करते त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादावर महायुतीचे सरकार सत्तेवर येईल त्यामुळे समाज उपयोगी कामात भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकुन द्यावे असे आवाहन केले. 

       यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, पश्चिम जिल्हा जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, प्रदेश सचिव महेश जाधव या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

         देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मांडला. तर महाराष्ट्र सरकारने अनेक चांगल्या लोकोपयोगी योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनचा ठराव जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत यांनी मांडल्या. तर या ठरावांना अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष अनिल कामत यांनी अनुमोदन दिले. या दोन्ही ठरावांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.

सूत्र संचलन जिल्हा सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन यांनी केले व आभार जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी मानले. 

       यावेळी विजय सूर्यवंशी, अशोक देसाई, नाना कदम, नाथाजी पाटील, डॉ आनंद गुरव, शिवाजीराव पाटील, हंबीरराव पाटील, सौ.सुशिला पाटील, रुपाराणी निकम, अनिता चौगले, प्रमोद कांबळे, धिरज करलकर, गिरीश साळोखे यांचे सह जिल्हयातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.