वेंगुर्ल्यात "नैसर्गिक सुगंधांचा विज्ञान, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक फायदा , महिला सक्षमीकरणासाठी वापर या विषयावर राष्ट्रीय परिषदचे आयोजन

वेंगुर्ल्यात  "नैसर्गिक सुगंधांचा विज्ञान, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक फायदा , महिला सक्षमीकरणासाठी वापर या विषयावर राष्ट्रीय परिषदचे आयोजन

कोल्हापूर : वेंगुर्ल्यात  "नैसर्गिक सुगंधांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक फायदा आणि महिला सक्षमीकरणासाठी वापर या विषयावर राष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद २१ व २२ मार्च २०२५ रोजी मधुसूदन कालेलकर सभागृह, वैगुली कॅम्प येथे पार पडेल. भारतीय महिला वैज्ञानिक संघटना (इवक्षा), बॅ. बाळासाहेब खर्डेकर महावि‌द्यालय, वेंगुर्ला , डॉ. गणपतराव देशमुख महावि‌द्यालय, सांगोला व वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. 

कोकणात आढळणाऱ्या सुरंगी या प्रदेशनिष्ठ सुगंधी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्य निर्मिती व त्यातून स्थानिक लोकांना अर्थार्जन तसेच या वनस्पतीचे पर्यावरणीय दृष्ट्‌या संवर्धन या विषयावर आधारित चर्चा व मार्गदर्शन सत्रे घेतली जातील. 

या परिषदेत देशातील नामांकित संशोधन संस्थांमधून काम करणारे माहिती तज्ञ मार्गदर्शन करतील. यात  सुनील लिमये (निवृत प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ), नागपूर विभाग, महाराष्ट्र), डॉ. विभा मल्होत्रा साहनी (अॅरोमा मिशन) व डॉ. श्रीरंग यादव (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी वि‌द्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. ज्योती मारवा (हिमसुरभी संशोधन संस्था, मसुरी), डॉ. विनय वाष्र्णेय (वन संशोधन संस्था (एफआरआय), देहरादून), डॉ. मानसिंगराज निंबाळकर (शिवाजी वि‌द्यापीठ, कोल्हापूर), डॉ. अजय राणे (कोकण कृषी वि‌द्यापीठ, दापोली), डॉ. सुनिता सिंघ धवन (सिमॅप, लखनऊ), डॉ. संजय कुमार (सिमॅप, लखनऊ), डॉ. आर. के. श्रीवास्तव (सिमॅप, लखनऊ), डॉ. प्रियंका ठाकूर (आरएचआरटिएस, हिमाचल प्रदेश), डॉ. व्ही. सुंदरेसन (सीमॅप, बंगळुरू), डॉ. अंशुला देशपांडे (सुमनदिप वि‌द्यापीठ, वडोदरा) इत्यादी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. 

नैसर्गिक सुगंधांच्या माहिती सत्रासोबतच साबण व पुष्पपेये तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातील. या परिषदेत विद्यार्थी, संशोधक व व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खर्डेकर महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले, इवझा समन्वयक डॉ. सीमा गायकवाड, सह-समन्वयक डॉ. मंजिरी मोरे-देसाई व डॉ. धनश्री पाटील, संयोजिका यांनी केले आहे.