कोरे पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड,आमदार कोरे साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार!

वारणानगर प्रतिनिधी – येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. हे उत्तम यश मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात आमदार कोरे साहेबांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश कसे मिळवता येते याबद्दल सांगितले.
या संस्थेतील विद्यार्थ्यांनी टेक्नीमोंट आय. सी. बी., मुंबई, टेकनीप एनर्जी, मुंबई , करमतरा इंजिनीयरिंग प्रायव्हेट लिमिटेड.मुंबई, कमिन्स इंडिया पुणे, केएसपीजे ऑटोमोटिव्ह पुणे, गॅब्रिएल इंडिया लिमिटेड पुणे, सिप्ला प्रायव्हेट लिमिटेड गोवा, विश्वकर्मा फाउंडरर्स कोल्हापूर अशा अनेक प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या जोरावर स्थान मिळवले आहे. या विद्यार्थ्यांची निवड विविध पदांसाठी झाली आहे, या शानदार यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य प्रा. पी. आर.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली. संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रशिक्ष आयोजित केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, डिग्री प्राचार्य डॉ. बी. टी. साळोखे, पॉलिटेक्निक प्राचार्य पी. आर. पाटील, डिग्री ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील,पॉलिटेक्निक ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. वाय. पोवार, सर्व विभाग प्रमुख आणि विभागाचे टीपीसी यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.