श्रीमंत जयसिंगराव घाटगे प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

श्रीमंत जयसिंगराव घाटगे प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कागल प्रतिनिधी : येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमाचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले तर यशश्री इंग्लिश मेडियम व प्राथमिक शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र नागरी अर्बन को.ऑप. बँकेच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा  नवोदिता घाटगे यांनी केले.

  यावेळी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या, शालेय जीवनात अभ्यासाबरोबर मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो.

वैशाली आवाडे म्हणाल्या,लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या घाटगे घराण्याच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे प्रशालेमुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी या शाळेची स्थापना केली. या प्रशालेचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत हे त्यांच्याच दूरदृष्टीचे हे प्रतिक आहे.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या, शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून वाव मिळतो . शिक्षकांबरोबरच पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.

          यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालकलाकारांच्या आदाकरीला उपस्थित सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला. 

         यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक यशवंत ऊर्फ बाॕबी माने, सचिन मगदूम,संजय नरके,भाऊसाहेब कांबळे,रेखा पाटील,सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,प्रशासन अधिकारी कर्नल एम.व्ही.वेस्वीकर,तानाजी चव्हाण,युवराज पसारे,कर्नल शिवाजीराव बाबर,नीतू बावडेकर,तुकाराम आवटे यांच्यासह शाळेचे शिक्षक, कर्मचारी, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे.व्ही.चव्हाण यांनी स्वागत केले.सूत्रसंचलन संजना बावडेकर यांनी केले.माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.डी. खोत यांनी आभार मानले. 

 

*आठवडी बाजारासह खाद्य महोत्सवाचे आकर्षण*

            विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा या हेतूने आठवडा बाजाराचे नियोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. विद्यार्थी फळभाजी, पालेभाज्या, कडधान्य,किराणा माल व इतर वस्तूंची खरेदी-विक्री करत होते.यासह प्रशालेकडून आयोजित फनी गेम्स व खाद्य महोत्सव आकर्षण ठरले.