संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाची ‘शिवस्पंदन’मध्ये विजयाची हॅटट्रिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवित संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने हॅटट्रिक नोंदविली आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते शिवस्पंदन महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेसह एकल नृत्य, नकला, रांगोळी, स्थळचित्रण, सुगम गायन, लघुनाटिका, भारतीय समूहगीत आणि समूहनृत्य प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवित सर्वसाधारण विजेतेपदावर सलग तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी प्रथमच शिवस्पंदन महोत्सवात केलेले सादरीकरण आजच्या अखेरच्या दिवसाचे तसेच महोत्सवाचेही वैशिष्ट्य ठरले.
महोत्सवात अखेरच्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य आणि समूहनृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांतील सादरीकरणांना तसेच पारितोषिक वितरण समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभला. विशेषतः श्रद्धा शुक्ला हिने नजाकतीने सादर केलेल्या ठसकेबाज लावणीला आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या दीपनृत्याला उपस्थितांची प्रचंड दाद मिळाली. त्याखेरीज जोगवा नृत्य, वारकरी नृत्य, तांडव नृत्य आदी सादरीकरणांनाही उत्तम प्रतिसाद लाभला.
या स्पर्धांनंतर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, महोत्सव समन्वयक डॉ. नितीन कांबळे, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. एस.एम. भोसले, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. कविता वड्राळे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मीना पोतदार यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. विद्यार्थी विकास मंडळाच्या डॉ. सुरेखा आडके, विजय इंगवले, विशाल म्हातुगडे, अभिषेक केंबळीकर यांनी यशस्वी संयोजन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा :
शोभायात्रा - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : राज्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ १: भूगोल अधिविभाग, उत्तेजनार्थ २ : मास कम्युनिकेशन अधिविभाग
लोकवाद्यवादन (एकल) - प्रथम : यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, तृतीय : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ २ : तंत्रज्ञान अधिविभाग
एकल नृत्य - प्रथम : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, द्वितीय : राज्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २ : रसायनशास्त्र अधिविभाग
नकला - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : एम.बी.ए.अधिविभाग, तृतीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ : पर्यावरणशास्त्र अधिविभाग
रांगोळी - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : समाजशास्त्र अधिविभाग, तृतीय : समाजशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: रसायनशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग
स्थळचित्र - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हल्पमेंट अधिविभाग, उत्तेजनार्थ १: रसायनशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: तंत्रज्ञान अधिविभाग
सुगम गायन - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : समाजशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग
लघुनाटिका - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, तृतीय : एम.बी.ए. अधिविभाग, उत्तेजनार्थ १: अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ २: यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभाग
मूकनाटय - प्रथम : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ: भूगोल अधिविभाग
भारतीय समूहगीत - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, तृतीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ: रसायनशास्त्र अधिविभाग
समूहनृत्य - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, तृतीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: वनस्पतीशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: भूगोल अधिविभाग