क्रांतिवीर बर्डे गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्य व्याख्यान संपन्न

क्रांतिवीर बर्डे गुरुजी यांच्या  पुण्यतिथी निमित्य व्याख्यान संपन्न

वाळवा (प्रतिनिधी) : वाटेगाव येथे क्रांतिवीर देशभक्त बर्डे गुरुजी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्य स्वतंत्र चळवळ आणि आजचा भारत या विषयावर एक दिवशीय व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  प्रा . दीपक स्वामी होते. 

यावेळी प्राप्त दिपक रोकडे ,सचिन शेवाळे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदीनिवड झाल्याबद्दल तसेच  हरिभाऊ साठे राज्यस्तरीय शिव सन्मान पुरस्कार प्राप्त आर .सी .पाटील आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .कार्यक्रमास पंचायत समिती माजी सदस्य नंदकुमार पाटील , सेवा सोसायटी अध्यक्ष सचिन बर्डे, उदय शेटे , माजी सरपंच मोहन चव्हाण , धनाजी ठोंबरे निवास शिंदे  ,सुवर्णपदक विजेते पै.आनंदराव धुमाळ, पोलीस पाटील संतोष करांडे, माणिक शेटे, जयवंत नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

आभार जयकुमार शेटे यांनी मांडले सूत्रसंचालन सुनील ढेबे यांनी केले.  कार्यक्रमाचे संयोजन जनार्दन साठे  ,महादेव खोत  ,कृष्णा मुळीक , सुनील नाईकडे यांनी केले .