गोकुळला २०२४-२५ मध्ये ११३ कोटींचा नफा

गोकुळला २०२४-२५ मध्ये ११३ कोटींचा नफा

कोल्हापूर : ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळला सन २०२४-२५ मध्ये ११३ कोटींचा नफा झाला. गोकुळच्या इतिहासामध्ये प्रथमच गोकुळला विक्रमी नफा झाला असल्याची माहिती कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिली. याबद्दल गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी अध्यक्षांसह सर्व संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

गोकुळच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी गोकुळच्या संचालकांसह अधिकाऱ्यांची बैठक बैठक गुरुवारी शाहूपुरीतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत नेत्यांनी आढावा घेतला. 

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला असल्याचे सांगितले. सर्व संचालकांनी काटकसरीने केलेल्या कारभारामुळे आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर देऊ शकलो. त्याचबरोबर यावर्षी नफाही चांगला मिळाला. याचे संपूर्ण श्रेय संचालक आणि अधिकार व कर्मचाऱ्यांना आहे. असे मंत्री मुश्रीफ व आ. पाटील यांनी सांगितले.