बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुटरची धक्कादायक माहिती, म्हणाला...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुटरची धक्कादायक माहिती, म्हणाला...

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. 

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली. शुभम लोणकर यांच्या शोधात असून पोलिस आहेत. या गोळीबारातील मुख्य शूटर शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा याला पोलिसांनी नेपाळमध्ये पळून जात असताना अटक करण्यात आली. 

पोलिस चाैकशीमध्ये शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा याने आता नवा धक्कादायक खुलासा केलाय. शिवा याने सांगितले की, ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच प्लॅनिंग सुरू होते. तेव्हा लॉरेन्स बिश्नोई आपल्याला फोनवर बोलला होता. शिवा म्हणाला, लॉरेन्स बिश्नोईने सांगितले होते की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तुम्हाला अटक केले तरीही घाबरू नका. पोलिसांना अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. तुम्हाला काही दिवसांमध्येच जेलबाहेर काढले जाईल.

आपली वकिलांची एक टीम आहे. हेच नाही तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आरोपी शिवाला 12 लाख लॉरेन्स बिश्नोई देणार होता. लॉरेन्स बिश्नोईने त्याला म्हटले होते की, जेलमधून बाहेर आल्यावर तुझी विदेशात जाण्याची सर्व जबाबदारी आमची असेल आणि बारा लाख रूपये देण्यात येतील. लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातच्या जेलमध्ये आहे. तिथूनच तो पूर्ण टोळी चालवत असल्याचे सांगितले जाते. त्यामध्येच आता आरोपी शिवाने सांगितले की, तो बिश्नोईला फोनवर बोलला होता.