होय माझा मुलगाच आरोपी,सैफच्या हल्लेखोराच्या आईचे विधान चर्चेत

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी चाकू हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला. तैमूर आणि जेहच्या खोलीत तो घुसला आणि एक कोटींची खंडणी मागीतली अशी माहिती मुलांची देखरेख करणा-या नॅनीने दिली. आरोपींनी चाकू हल्ला केला त्यात सैफ अली खान गंभीर जखमी झालेला. मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान वर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.
संशयित आरोपीकडून पोलिसांनी त्याचा फोन आणि इयरफोन सुद्धा जप्त केलेले. त्यानंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी त्या गोष्टी पाठवण्यात आल्या. आरोपीच्याच फोनवरून पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना देखील फोन केला तेव्हा माझा मुलगा आरोपी आहे.... असं त्याच्या आईनेच सांगितलं. आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तपास अधिकारी तडकाफडकी बदलले
सध्या हे प्रकरण खूप तापलेले आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी संशयित व्यक्तीला ठाणे विभागातील खारफुटी झुडपांतून अटक केली. मात्र काल मध्यरात्री या प्रकरणाला मोठे वळण लागले आहे. सैफ अली खान प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सुरुवातीला हा तपास पी आय अधिकारी सुदर्शन गायकवाड करत होते मात्र आता ही जबाबदारी अजय लिंगाणूकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र तडकाफडकी हा निर्णय का घेण्यात आला हे अद्याप समोर आलेले नाही.