मनसेच विधान परिषद निवडणुकीत महायुतीशी बिनसलं

मनसेच विधान परिषद निवडणुकीत महायुतीशी बिनसलं

मुंबई (प्रतिनिधी) :  लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, परंतु विधान परिषद निवडणुकीसाठी मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले की विधान परिषद निवडणुकीत मनसेने महायुतीशी युती करण्याची चर्चा अद्याप केली नाही 

संदीप देशपांडे म्हणाले, “मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या निवडणुकित महायुतीला पाठिंबा देण्याचा आदेश दिलेला नाही. आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या विवेकाने मतदान करतील".