राज्यसभेसाठी छगन भुजबळांन ऐवजी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात हजेरी लावली. त्यांच्या उमेदवारीवर मोहर उमटवल्यानंतर त्यांनी आवश्यक दस्तावेज सादर केले आणि अर्ज दाखल केला. विधानभवनात त्यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसोबत उपस्थिती दर्शवली.सुनेत्रा पवार यांची उमेदवारी पक्षाच्या पुढील रणनीतीचा एक भाग असल्याचे समजते. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाच्या राजकीय योजनांमध्ये महत्वाचा बदल होऊ शकतो अशा चर्चांना आता उधान आलं आहे.
या जागेसाठी छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होती. आज याबाबत बैठक घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, “मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि इतर मंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत विचाराअंती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे हा सर्वानुमते निर्णय झाला आहे.
राज्यसभेतील निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्या अनुषंगाने येणारे बदल हे आगामी काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.