समिधा माळी किणी केंद्रात प्रथम
किणी: प्रतिनिधी परशुराम घोरपडे ता.१७ : ता. हातकणंगले येथील किणी हायस्कूल किणीचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के लागला. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल सलग तेराव्या वर्षी १०० टक्के लागला. विद्यालयाच्या समिधा माळी हिने ९६ टक्के गुण मिळवून किणी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला.विशेष बाब म्हणजे किणी केंद्रातील पहिले तीन क्रमांक किणी हायस्कूल किणीच्या विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत .
निकाल पुढील प्रमाणे -- सेमी इंग्रजी माध्यम -
समिधा सतिश माळी ९६%, प्रथम
फहिम बशीर मणेर ९५.२०%, द्वितीय
यश सागर देसाई ९४.४० %, तृतीय
मराठी माध्यम
धनश्री भागवत पाटील - ८८.२०% प्रथम
अभिजीत तानाजी भाट - ८६.४०% द्वितीय
रुक्सार आसिफ बिजली - ८६.२०% तृतीय
९०% पेक्षा जास्त - o८ विद्यार्थी
८० ते ८९ % - ३२ विद्यार्थी
७० ते ७९% - २९ विद्यार्थी
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बी. डी . मलगुंडे , पर्यवेक्षक डी .डी. चव्हाण यांचे मार्गदर्शन व किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील ,उपाध्यक्ष सुनिल कदम, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.