पडळकरांचा पवारांवर घणाघात ; इतिहास लिहायचा आहे तर एकदाच लिहून टाका ...

पडळकरांचा पवारांवर घणाघात ; इतिहास लिहायचा आहे तर एकदाच लिहून टाका ...

पुणे - महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस तीव्र होत असताना, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संपूर्ण प्रकरणावरून शरद पवार आणि संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ब्रिगेडींचा नेता संकटात आला की, अशा जुन्या मुद्द्यांना उगाळून वातावरण तापवलं जातं. 

पडळकरांनी पवारांवर टीका करत म्हटलं की, "त्यांनी आता पक्ष अजित पवारांकडे दिलाय, त्यामुळे त्यांच्या हातात भरपूर वेळ आहे. त्यांनी मग इतिहास लिहून टाकावा. कोणत्या जातीवर टीका करायची, कोणत्या महापुरुषांचं महत्त्व वाढवायचं, आणि यातून मतं मिळवायची कशी ही रणनीती एकदाच लिहून ठेवावी." त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध पवार संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टपणे म्हटलं की, अनेक वर्षांपासून ब्राह्मणांवर टोकाची टीका करून बहुजन समाजाला भडकावून सत्तेत येण्याचा प्रयत्न सुरू होता. पण २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये लोकांनी तो उद्योग मोडून काढल्याचा दावा त्यांनी केला.