HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ..!

भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ..!

कोल्हापूर - भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात जवाहर नगर चौक, शाहूनगर चौक, विक्रम नगर, सदर बाजार, विचारे माळ, लाईन बाजार, कसबा बावडा, रमण मळा या ठिकाणी डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

तसेच या अभिवदनानंतर सर्व समाजातील समाज बंधूंशी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना ज्या अंमलात आणल्या जात आहेत त्या सर्व दूर पोहोचवण्याचा विशेष प्रयत्न या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समतेचा, समानतेचा आणि सामाजिक समरसतेचा विचार दिलेला आहे. तो खऱ्या अर्थानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या चार सूत्रानुसार भारत देश मोठी महासत्ता बनवण्याच्या दिशेने तसेच सर्व समाजातील लोकांच्या उन्नतीसाठीचे प्रयत्न या माध्यमातूनच दिसत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नमूद केले.

यावेळी अमर साठे, अनिल कामत, प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, राजगणेश पोळ, दत्ता लोखंडे, प्रसाद पाटोळे, रवींद्र मुतगी, सनी आवळे, रविकिरण गवळी, डॉक्टर राजवर्धन, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, विशाल शिराळकर, आप्पा लाड, दत्ता लोखंडे, संदीप कुंभार, धनश्री तोडकर, स्वाती कदम, मानसिंग पाटील, भरत काळे, सुनील पाटील, अवधूत भाटे, हेमंत पाटील, बापू राणे, पालकर, आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.