HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मुश्रीफसाहेब,बांधकाम कामगारांना दम द्यायचा बंद करा,अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ : कॉम्रेड शिवाजी मगदूम

मुश्रीफसाहेब,बांधकाम कामगारांना दम द्यायचा बंद करा,अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ : कॉम्रेड शिवाजी मगदूम

मतदारसंघातील एजंटगिरी,खंडणीखोरवृत्ती संपविण्यासाठी साथ द्या : राजे समरजितसिंह घाटगे

  कागल प्रतिनिधी - 2019 मध्ये लाल बावटा संघटनेने जेंव्हा विद्यमान पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला तेंव्हा आपल्याला दहा हत्तींचे बळ मिळाले अशा शब्दात आमचे त्यांनी कोडकौतुक केले होते. मात्र आज आम्ही त्यांच्या विरोधातील राजे समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते सैरभैर होऊन कामगारांना लक्ष्य करत आहेत. लोकशाहीमध्ये ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.त्यामुळे मुश्रीफ साहेब आमच्या कामगारांना दम द्यायचा बंद करा अन्यथा आमचे कामगार त्यांच्या हातातील साहित्यानीशी त्याच भाषेत उत्तर देतील असा सज्जड दम लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिला..

         मुरगुड येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटना , ऊस तोडणी कामगार संघटना, किसान सभा तसेच शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांना विजयी करण्यासाठी शहरातून रॅली काढून त्यांना जाहीर पाठिंबा दिला.त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

     कॉम्रेड मगदूम पुढे म्हणाले,अडीच वर्षांपूर्वी पालकमंत्री महोदयांनी मागच्या दाराने दुसऱ्या पक्षाशी युती केल्यामुळे आज ही त्यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आलेली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बांधकाम कामगारांनी मतदानाच्या माध्यमातून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र त्या बदल्यात त्यांनी केवळ आमची संघटना संपवण्याचाच प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर आमच्या कामगारांनी केलेल्या अर्जांमध्ये त्रुटी,दुरुस्त्या,चुका असल्याचे वारंवार सांगून आमच्या कामांकडे दुर्लक्ष केले.

         यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कामगारांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी एक प्रभावशाली विचारधारा असायला हवी अशीच धारणा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांची होती.आमचीही तीच भुमिका आहे.मात्र कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देताना लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात चिरीमिरी साठी एजंटगिरी सुरू आहे. ही अत्यंत दुर्दैवाची आणि अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे येत्या काळात ही एजंटगिरी आणि खंडणीखोर वृत्ती या मतदारसंघातून कायमची संपविण्यासाठी आम्हाला साथ द्या असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

                  प्रा.सुभाष जाधव,कॉ शिवाजी मगदूम, कॉ.प्रकाश कुंभार,डॉ. प्रविण जाधव,कॉ.संदीप सुतार, कॉ.राज कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

       यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, राजाराम आरडे,विनायक सुतार, दगडु कांबळे, जोतिराम मोगणे , पांडुरंग मोरबाळे ,शिवाजी पाटील ,यलाप्पा पाटील ,सुभाष पाटील ,शिवाजी लोहार ,युवराज शिंदे ,राजु कांदळकर ,संतोष शेटके, संतोष गायकवाड, संकेत भोसले यांच्यासह पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..

        स्वागत प्रास्ताविक विक्रम खतकर यांनी केले.आभार दिनकर जाधव यांनी मानले. 

           पालकमंत्र्यांचे कष्टकरी,कामगार  वर्गाकडे दुर्लक्ष.......

          कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले, गेली 25 वर्षे कामगारांच्या,कष्टकऱ्यांच्या बळावर जे सत्तेत बसलेले आहेत त्या पालकमंत्र्यांनी या मतदारसंघातील कामगार, कष्टकरी वर्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे.वारंवार त्यांना पाठिंबा देऊनही त्यांनी आमची संघटना बेदखल करून संघटना फोडण्याचेच पाप केले आहे. मागच्या दाराने पळून जाऊन त्यांनी केवळ स्वतःचेच भले केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सर्वच कामगार संघटनांनी मिळून आपला लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विकासाचे व्हिजन असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांना पाठवण्याचा निर्धार केलेला आहे.....

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.