उदय सामंतांना जगभराची पूर्ण माहिती , असं का म्हणाले केसरकर?

सिंधुदुर्ग : उदय सामंत तर एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कुणी बोलूच शकत नाही. त्यांना जगभराची पूर्ण माहिती असते. त्यामुळे त्यांनी निश्चितच याविषयी अभ्यास केलेला असेल, असं मत माजी मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नाणार रिफायनरीबाबत बोलताना व्यक्त केलं.
ग्रीन रिफायनरीची माहिती मागवावी लागेल, लोकांपुढे ती आणावी लागेल. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याबाबत कॉमेंट करु शकू. परंतु राणे साहेब (खासदार नारायण राणे) स्वतः उद्योगमंत्री होते, केंद्रामध्ये. त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे. उदय सामंत तर एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कुणी बोलूच शकत नाही. त्यांना तर पूर्ण माहिती असते जगभराची. त्यामुळे त्यांनी निश्चितपणे याविषयी अभ्यास केलेला असणार, असं केसरकर म्हणाले.
काय म्हणाले दीपक केसरकर ?
नाणारचा प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे. ग्रीन रिफायनरी जेव्हा असते, तेव्हा एवढी झाडं लावली जातात, की कुठलंही प्रदूषण बाहेर होत नाही. आता तो ग्रीन रिफायनरी खरोखर आहे का, हे तपासावं लागेल. कालपर्यंत एन्रॉनबद्दल काजू-आंबा-माशांवर काही परिणाम होईल असं बोललं जायचं. एन्रॉनने हे स्पष्टसिद्ध करुन दाखवलंय, की एन्रॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही, आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही, मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही, मग रिफायनरीमुळे हे होईल, असं तुम्ही आजच गृहित का धरताय? असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.