"हिट अँड रन"बाबत मुख्यमंत्र्यांचं मोठा वक्तव्य!
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील वरळी भागात नुकत्याच घडलेल्या हिट अँड रन घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याचं नाव पुढे आलं आहे. अपघाताच्या वेळी मिहीर शाह गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावर द्वीट करत या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या द्वीटमध्ये राज्यातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, दोषींना कोणतंही राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही. त्यांनी म्हटलं आहे की, दोषी व्यक्ती कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा लोकप्रतिनिधींची मुलं असो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.यामुळे राज्यात वाढलेल्या हिट अँड रन घटनांबद्दल कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.हा मुद्दा सध्या खूपच चर्चेत आहे, आणि या प्रकरणात पुढील तपास काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.