इंचलकरंजीत युवकाची निर्घृण हत्या:तिघांना कोठडी

इंचलकरंजीत युवकाची निर्घृण हत्या:तिघांना कोठडी

कोल्हापूर-इंचलकरंजी हद्दीतील शहापूर येथे रहात असलेला सुशांत दिपक कांबळे (वय 18.रा.आसरानगर ,इंचलकरंजी ) याचा बुधवार दि.03/07/2024 रोजी रात्री सव्वा एक ते गुरुवार दि.04/07/2024 रोजीच्या सकाळी याचा धारदार शस्त्रांने वार करून खून केल्या प्रकरणी अतिष नेटके (वय 19.रा.सहकारनगर,इंचलकरंजी) आर्यन चव्हाण(21.रा.गणेशनगर ,इंचल)आणि प्रदिप पारस (वय 20. रा. जे.के.नगर ,शहापूर ) या संशयीत हल्लेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त तपास करुन काही तासातच अटक केली.या घटनेची फिर्याद श्रीमती दिपाली दिपक कांबळे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली.शहापूर पोलिसांनी संशयीतावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

या अल्पवयीन मुलाचा खुन प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानला आणि शहापूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हें अन्वेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी या गुन्हयाची माहिती घेऊन शहापूर पोलिसांच्या मदतीने दोन पथके तयार करून संशयीताचा शोध घेऊ लागले.याचा शोध घेत असताना या खूनातील संशयीत हे कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या मागील बाजूस असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.या तिघांच्या अधिक चौकशी केली असता यातील मयत सुशांत कांबळे आणि संशयीत अतिष नेटके हे एकमेकाचे मित्र आहेत.त्यांच्यात शर्यतीची घोडा गाडी परत मागितल्या वरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता.याचा राग मनात धरुन बुधवार दि.03/07/2024 रोजी डॉ.सरोजनी नायडू विद्यालयाच्या जवळ सुशांत कांबळे थांबला असताना आरोपी अतिष नेटके ,आर्यन चव्हाण आणि प्रदिप पारस या तिघांनी मिळून सुशांतवर धारदार शस्त्रांने त्याच्या पाटीवर ,तोंडावर व मानेवर वार करून खून केल्याची कबुली दिली.

या खूनातील आरोपींना गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि शहापूर पोलिसांनी काही तासातच अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी मा.समीस सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सुर्यवंशी,उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील संदिप जाधव , आणि शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.