उन्हामुळे नागरिकांची काहिली काहीली... आज पारा 39 अंशावर जाण्याची श्यकता..
कोल्हापुरात गेले काही दिवस उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच ही अवस्था, तर पुढे एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल? अशी चिंता सर्वसामान्यांना लागली आहे. यंदाचा उन्हाळा जास्त कडक असणार असल्याचं म्हटलं जातंय. मुंबईतील तापमानात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. 30 मार्च रोजी हे 34 अंश सेल्सिअवर पोहोचलं, तर 31 मार्च रोजी त्यात वाढ होऊन ते 33 अंशांपर्यंत तर आज उष्णतेचा पारा 39 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
एकंदरीतच पाहता आता राज्याचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या घरात जाण्याची शक्यता नक्कीच निर्माण झाली आहे. त्यामुळे आजारी तसंच ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांनी उन्हात फिरू नये, असं आवाहन करण्यात आलंय. वाढत्या पाऱ्यामुळे खरंच राज्याला ‘हिट वेव्ह’चा सामना करावा लागणार की काय असा प्रश्न पडतोय. परंतु प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, उन्हातून बाहेर न पडता शरीर जास्तीत जास्त हायड्रेटेड कसं राहिल याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. एकीकडे तापमान वाढ असूनही गेल्या दोन तीन दिवसांपासून वळिवाच्या पावसामुळे उकाड्यापासून पश्चिम महाराष्ट्राला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसामुळं शेतमालाचं नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.