प्रसिद्ध संगीतकार एआर. रहमान यांचा घटस्फोट ; पत्नी सायरा बानोला किती मिळणार पोटगी ?
मुंबई : देशातील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार एआर. रहमान यांनी अलीकडेच पत्नी सायरा बानोसोबत २९ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटाची घोषणा केली.सर्वांनाच माहित आहे की रहमान अफाट संपत्तीचा मालक आहे. आता सिनेसृष्टीत सायरा बानो यांना किती पोटगी मिळणार याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एआर रहमान यांचा २९ वर्षांचा संसार मोडला असून ते तीन मुलांचे पालकसुद्धा आहेत.एआर रहमान आणि सायरा बानो दोघेही मुस्लिम समाजातील असून पोटगीचे नियम वेगळे आहेत. मुस्लिम समाजातील घटस्फोटाबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, इस्लाममध्ये विवाह हा एक करार आहे. या अंतर्गत हुंड्याची रक्कम निश्चित केली जाते. याबाबत एक औपचारिक कागद तयार केला जातो आणि दोन्ही पक्ष त्या कागदावर स्वाक्षरी करतात. लग्न मोडल्यास किंवा घटस्फोट झाल्यास हुंडा ही रक्कम महिलेला दिली जाते. अशा परिस्थितीत एआर रहमानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सायराला हुंड्याचीच रक्कम मिळणार आहे. मात्र, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून त्यात म्हटलं आहे की, मुस्लिम महिला तिच्या पतीकडून भरणपोषण घेण्यास पात्र आहे.
एआर रहमान यांची एकूण संपत्ती -
एआर रहमान प्रत्येक गाण्यासाठी ३ कोटी रुपये घेत असून त्यांची एकूण संपत्ती १७२८ कोटी ते २००० कोटी रुपये आहे. एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी ते २ कोटी रुपये घेतात. त्याचबरोबर त्यांचे लॉस एंजेलिससह देशातील अनेक शहरांमध्ये बंगले आहेत.
.. तर सायराला एआर रहमानकडून मेंटेनन्स मिळणार -
सीआरपीसीच्या कलम १२५च्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पत्नी, मुले आणि अगदी पालकांच्या पालनपोषणाचा निर्णय घेण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हा निर्णय म्हणजे मुस्लिम वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे. जर हा निर्णय आधार मानला गेला तर सायराला एआर रहमानकडून मेंटेनन्स मिळण्याची पात्रता आहे.