मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आजचा 'सिकंदर'चा टिझर रद्द

मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आजचा 'सिकंदर'चा टिझर रद्द

मुंबई: डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी हळहळली. अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्यांचा एआर मुरुगडोस यांनी दिग्दर्शित केलेला सिकंदर या सिनेमाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनानं देश दु:खात असताना सिनेमाचा टीझर प्रदर्शित न करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे.सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा २६ डिसेंबर २०२४ पासून १ जानेवारी २०२५ पर्यंत पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.